महाराष्ट्र कनेक्ट ३६
नवी आव्हाने , नवे संघर्ष आणि नव्या प्रलोभनाचा सूर्य डोक्यावर तळपत असतांना तरुणांना समृद्ध आणि स्वावलंबी बनविणे ही काळाची गरज आहे आजच्या सतत विकसित होत असलेल्या जगात, भविष्य घडवण्यात तरुणांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. ही प्रचंड क्षमता ओळखून भारतीय जनता पक्षाचा पदवीधर प्रकोष्ठ तरुणांना सक्षम बनविण्यावर आणि सकारात्मक सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी त्यांच्या क्षमतांचा उपयोग करण्यावर विशेष लक्ष केंद्रित करू इच्छित आहे.
जागतिकीकरणाच्या या युगात तरुण पदवीधरांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे , शिक्षण आणि उदरनिर्वाह याची सांगड घालताना त्यांची होणारी दमछाक आणि वाढती स्पर्धा या जीवघेण्या प्रवासात यशस्वी होण्यासाठी भाजपा पदवीधर प्रकोष्ठ ‘’महाराष्ट्र कनेक्ट ३६’’ माध्यमातून नवयुवकांना उदयॊग , व्यवसायात मदतीचा हात देऊन त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी उपलब्ध करून देत आहे एक आगळंवेगळं व्यासपीठ ….
संकल्पना –
महाराष्ट्र कनेक्ट ३६ ही संकल्पना महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यातील ३६ तरुणांसाठी असून या विशेष उपक्रमाच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील ३६ तरुणांना उद्योग /व्यवसायासाठी प्रेरित करून त्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांना वाव देवून व्यवसायाच्या प्रारंभिक माहिती पासून ते व्यवसायाच्या वृद्धी पर्यंत त्यांना सहकार्य करणे अपेक्षित व नियोजित आहे … या उपक्रमाचा हा पहिला टप्पा असून या नंतर याच पटीत पुढे सातत्याने युवकांच्या विकासासाठी हे कार्य निरंतर चालू राहील….
महाराष्ट्र कनेक्ट ३६ ची उद्दिष्टे-
१. शिक्षण आणि रोजगार यांच्यातील दरी कमी करणे
२. कौशल्य विकास: तरुणांना बाजारपेठेशी संबंधित कौशल्ये सुसज्ज करण्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षण देणे, त्यांच्या रोजगाराच्या संधी वाढवणे.
३.उद्योजकता विकास: तरुणांमध्ये उद्योजकता आणि स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देणे, नवकल्पना आणि आर्थिक स्वातंत्र्याला चालना देणे.
४. जीवन कौशल्य प्रशिक्षण: संप्रेषण, संघकार्य, नेतृत्व आणि समस्या सोडवणे यासह आवश्यक जीवन कौशल्यांमध्ये सर्वसमावेशक प्रशिक्षण प्रदान करणे.
५.डिजिटल साक्षरता:आधुनिक युगात डिजिटल कौशल्यांचे महत्त्व ओळखून, डिजिटल साक्षरतेचे प्रशिक्षण देणे, तरुणांना डिजिटल युगासाठी आवश्यक साधनांसह सुसज्ज करणे.
६. राज्यातील ३६ जिल्ह्यातील ३६ सृजनशील तरुणांना आत्मनिर्भर बनविणे .
महाराष्ट्र कनेक्ट ३६ अभियानाचे महत्वपूर्ण तिमाहीत टप्पे
१. नोंदणी व प्रमाणन- ऑगस्ट ते ऑक्टोबर
२. समुपदेशन व दिशादर्शन- नोव्हेंबर ते जानेवारी
३. आर्थिक व्यवस्था /दिशादर्शन- फेब्रुवारी ते एप्रिल
४. अंमलबजावणी – एप्रिल ते जुलै
महाराष्ट्र कनेक्ट ३६ चे महत्त्व
कोणत्याही राष्ट्राच्या सर्वांगीण विकास आणि प्रगतीमध्ये युवा सक्षमीकरणाची भूमिका महत्त्वाची असते. तरुण व्यक्तींच्या क्षमतेमध्ये गुंतवणूक करून, समाज एक कुशल कार्यबल तयार करू शकतो, उद्योजकता वाढवू शकतो आणि नवकल्पना चालवू शकतो. सशक्त तरुण बदलाचे कारण बनतात, सामाजिक समस्यांचे निराकरण करतात आणि त्यांच्या समुदायाच्या आर्थिक वाढीसाठी आणि कल्याणासाठी योगदान देतात. म्हणूनच महाराष्ट्र कनेक्ट ३६ च्या माध्यमातून अशा युवकांना सक्षम बनविण्यासाठी प्रकोष्ठ कटिबद्ध असेल .
पदवीधर प्रकोष्ठ , भाजपा , महाराष्ट्र राज्य
पदवीधर प्रकोष्ठ
भारतीय जनता पक्ष हा देशातीलच नाही तर जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. भारतीय जनता पक्षाची विचारधारा ही जनसामान्यांच्या समस्या सोडवण्याच्या निगडीत असल्यामुळे, या पक्ष्याची विचारधारा जनसामान्यांपर्यंत आणि तळागाळा पर्यंत पोहोचावी यासाठी समाजातील जे वेगवेगळे आयाम आहेत त्या आयामापर्यंत पोहोचण्यासाठी भारतीय जनता पक्षाने प्रकोष्ठाची स्थापना केली.