छायाचित्रे

पदवीधर प्रकोष्ठ संकेतस्थळाचे उद्घाटन आणि सरल सदस्य नोंदणी अभियान कार्यक्रम ऑनलाईन संपन्न
आज दिनांक १४ एप्रिल २०२३ रोजी भाजपा पदवीधर प्रकोष्ठ संकेतस्थळाचे उद्घाटन आणि सरल सदस्य नोंदणी अभियान या कार्यक्रमाचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे, भाजपा, महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस मा. श्री. विक्रांत पाटील, आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन मा. श्री. धनराज विसपुते , भाजपाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते , पदवीधर प्रकोष्ठचे ५०० सदस्य, विभागाचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक हे सर्व उपस्थित होते, सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. श्री. धनराज विसपुते यांनी केले आपल्या प्रस्ताविकातून त्यांनी प्रकोष्ठची भूमिका स्पष्ट केली. ऑनलाईन पद्धतीने मान्यवरांच्या परवानगीने पदवीधर प्रकोष्ठच्या संकेतस्थळाचे ऑनलाईन उदघाटन करण्यात आले व सरल नोंदणीसाठी मार्गदर्शन करण्यात आले. प्रमुख अतिथी मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या मार्गदर्शनातुन पदवीधरांचे प्रश्न व सरल सदस्य नोंदणी अभियान याविषयी मार्गदर्शन करत भाजपाची भूमिका आणि भविष्यातील सर्वांचे कर्तव्य यावर प्रकाश टाकत सर्वांना एक नवी दिशा दिली . तर मा. श्री. विक्रांत पाटील यांनी पदवीधरांच्या विविध प्रश्नांचे नक्कीच निरसन केले जाईल पण यासाठी साऱ्यांनी हातात हात घालून काम केले पाहिजे अशा शब्दात विश्वास दिला. या ऑनलाइन कार्यक्रमासाठी रायगड, बीड, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर, जळगाव, चंद्रपूर अशा विविध जिल्ह्यातुन पदवीधर सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.एड.व एम. एड कॉलेज पनवेल च्या प्राचार्य डॉ. सीमा कांबळे मॅडम यांनी केले व शेवटी उपस्थितीतांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.

पदवीधर प्रकोष्ठ


भारतीय जनता पक्ष हा देशातीलच नाही तर जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. भारतीय जनता पक्षाची विचारधारा ही जनसामान्यांच्या समस्या सोडवण्याच्या निगडीत असल्यामुळे, या पक्ष्याची विचारधारा जनसामान्यांपर्यंत आणि तळागाळा पर्यंत पोहोचावी यासाठी समाजातील जे वेगवेगळे आयाम आहेत त्या आयामापर्यंत पोहोचण्यासाठी भारतीय जनता पक्षाने प्रकोष्ठाची स्थापना केली.