पदवीधर प्रकोष्ठ
भारतीय जनता पक्ष हा देशातीलच नाही तर जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. भारतीय जनता पक्षाची विचारधारा ही जनसामान्यांच्या समस्या सोडवण्याच्या निगडीत असल्यामुळे, या पक्षाची विचारधारा जनसामान्यांपर्यंत आणि तळागाळा पर्यंत पोहोचावी यासाठी भारतीय जनता पक्षाने प्रकोष्ठाची स्थापना केली. यामध्ये वेगवेगळे प्रकोष्ठ आहेत जसकी वैदयकिय प्रकोष्ठ, अभियंता प्रकोष्ट, विधी प्रकोष्ठ, अध्यात्मिक प्रकोष्ठ, बुद्धीजीवी प्रकोष्ठ, शैक्षणिकसंस्था प्रकोष्ठ, शिक्षक प्रकोष्ठ असे वेगवेगळे प्रकोष्ठ आहेत. आणि अशा या विविध प्रकोष्ठांचे उद्दीष्ट त्या त्या घटकांच्या संबंधीत आहेत.
त्या त्या घटकांच्या समस्या सोडवणे हा त्या त्या प्रकोष्ठाचा हेतू आहे. त्याच पद्धतीने भारतीय जनता पक्षाने आता महाराष्ट्रातील विविध पदवीधरांच्या समस्या सोडवण्यासाठी पदवीधरांना विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि पदवीधरांपर्यंत भारतीय जनता पक्षाची विचारधारणा पोहोचवण्यासाठी आता नव्याने भारतीय जनता पक्षाचा पदवीधर प्रकोष्ठ स्थापन केलेला आहे. या प्रकोष्ठाच्या पुढील कालावधीत महाराष्ट्रातल्या पदवीधरांना या प्रकोष्ठाशी जोडले जाणार आहे. आणि या पदवीधरांच्या समस्या सोडवल्या जाणार आहेत. त्यांच्यासाठी काही उपक्रमांची अंमलबजावणी केली जाणार आहे . असे विविध कार्यक्रम या प्रकोष्ठाच्या माध्यमातून राबवले जाणार आहेत.
पदवीधर हा खऱ्या अर्थाने भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. पदवीधारकांची केवळ भूक भागून चालणार नाही तर सुशिक्षित पदवीधरांना या शिक्षणाच्या बळावर चांगली नोकरी , उद्योग युवकांना मिळणे व त्यातून युवकांना स्वावलंबी बनणे गरजेचे आहे . शिक्षण रुपी शस्त्र हातात असून देखील पदवीधारकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शिक्षण असले तरी नोकरी नाही , कला – कौशल्य असूनही आर्थिक पाठबळाअभावी उद्योग – व्यवसायाची संधी नाही, अशा पदवीधारकांच्या विविध समस्यांकडे सर्वांचे दुर्लक्ष होते. पण पदवीधरांच्या समस्या अग्रक्रमानं सोडविल्यास त्यांच्या प्रगतीला एक नवीन आयाम प्राप्त होईल आणि खऱ्या अर्थाने भारत सक्षम देश बनेल. हाच ध्यास घेऊन महाराष्ट्रातील पदवीधारकांना विविध संधीची दालने खुली करून देण्यासाठी व पदवीधारकांच्या स्वावलंबनाकडे एक पाऊल पुढे टाकण्यासाठी त्यांची नाव नोंदणी मोहीम सुरु केली आहे.
श्री. धनराज देविदास विसपूते हे पदवीधर प्रकोष्ठचे प्रदेश संयोजक असून त्यांच्या नेतृत्वाखाली ही संपूर्ण कार्यप्रणाली कार्यरत राहील.
पदवीधर प्रकोष्ठ
–> रचना <–
महाराष्ट्र प्रदेश संयोजक [०९]
↓
प्रदेश संयोजक / विभागीय संयोजक [०७ विभागनिहाय ]
↓
६८ जिल्हा संयोजक
↓
१३६ जिल्हा सहसंयोजक
↓
जिल्हानिहाय कार्यकारिणी [ किमान ११ सदस्य ]
↓
सोशल मीडिया प्रमुख
–> जिल्हा कार्यकारिणी [ किमान ९९ ] <–
जिल्हा संयोजक [ ०९ ]
↓
जिल्हा सहसंयोजक [ ०२ ]
↓
जिल्हा प्रभारी [ ०१ ]
↓
जिल्हा संवादक [ ०२ ]
↓
सोशल मीडिया प्रमुख [ ०२ ]
↓
प्रसिद्धी प्रमुख [ ०१ ]
↓
महिला प्रतिनिधी [ ०२ ]
–> सदस्यत्वासाठी नियम व अटी <–
१) संबंधित व्यक्ती महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
२) सदस्य डिप्लोमाधारक / पदवीधर असावा. [ कोणत्याही विद्यापीठाचा व कोणत्याही शाखेचा ]
३) सदस्यनोंदणीचा ऑनलाईन फॉर्म भरणे अनिवार्य आहे.
पदवीधर प्रकोष्ठ
भारतीय जनता पक्ष हा देशातीलच नाही तर जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. भारतीय जनता पक्षाची विचारधारा ही जनसामान्यांच्या समस्या सोडवण्याच्या निगडीत असल्यामुळे, या पक्ष्याची विचारधारा जनसामान्यांपर्यंत आणि तळागाळा पर्यंत पोहोचावी यासाठी समाजातील जे वेगवेगळे आयाम आहेत त्या आयामापर्यंत पोहोचण्यासाठी भारतीय जनता पक्षाने प्रकोष्ठाची स्थापना केली.