भारतीय जनता पक्षाचा इतिहास

भारतीय जनता पक्ष हा भारतातील एक राष्ट्रीय राजकीय पक्ष आहे. या पक्षाची विचारधारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत संलग्न असून त्याची धोरणे उजवीकडे झुकणारी आहेत असे मानले जाते. २०१४ सालापासून संसदेच्या लोकसभा सभागृहामध्ये भाजपचे बहुमत असून विद्यमान भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपचे सदस्य आहेत.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत परत भारतीय जनता पक्षाने बाजी मारली. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला ४८ पैकी २३ जागा मिळाल्या. तसेच शिवसेना व भारतीय जनता पक्षाची युतीने ४८ पैकी ४२ जागी घवघवीत यश मिळवले. भारतीय जनता पक्षाचे नेते नरेंद्र मोदी हे वाराणसीतून निवडून आले आहेत…अधिक

पदवीधर प्रकोष्ठ

पदवीधर हा खऱ्या अर्थाने भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. पदवीधारकांची केवळ भूक भागून चालणार नाही तर सुशिक्षित पदवीधरांना या शिक्षणाच्या बळावर चांगली नोकरी , उद्योग व्यवसाय मिळणे व त्यातून युवकांना स्वावलंबी बनवणे गरजेचे आहे . शिक्षण रुपी शस्त्र हातात असून देखील पदवीधारकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शिक्षण असले तरी नोकरी नाही , कला – कौशल्य असूनही आर्थिक पाठबळाअभावी उद्योग – व्यवसायाची संधी नाही, अशा पदवीधारकांच्या विविध समस्यांकडे सर्वांचे दुर्लक्ष होते. पण पदवीधरांच्या समस्या अग्रक्रमानं सोडविल्यास त्यांच्या प्रगतीला एक नवीन आयाम प्राप्त होईल आणि खऱ्या अर्थाने भारत सक्षम देश बनेल. हाच ध्यास घेऊन नाशिक विभागातील पदवीधारकांना विविध संधीची दालने खुली करून देण्यासाठी व पदवीधारकांच्या स्वावलंबनाकडे एक पाऊल पुढे टाकण्यासाठी त्यांची नाव नोंदणी मोहीम सुरु केली आहे. या माध्यमातून पुढील गोष्टी साद्य करावयाच्या आहेत…अधिक

रचना

पदवीधर प्रकोष्ठ संयोजक

साहसायोजक (७ विभाग निहाय)

जिल्हा संयोजक (६८ निहाय)

मंडळ संयोजक – ७०४

संपर्क प्रमुख

सहसंपर्क प्रमुख

अंमलबजावणी

,

पदवीधर प्रकोष्टचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे प्रशिक्षण

,

मंथन सभा

,

पदवीधर वैचारिक शंखला - एका व्यक्तीने १०० पदवीधर जोडणे

,

माझा पक्ष माझा मित्र

संकल्प

पदवीधर प्रकोष्ठ


भारतीय जनता पक्ष हा देशातीलच नाही तर जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. भारतीय जनता पक्षाची विचारधारा ही जनसामान्यांच्या समस्या सोडवण्याच्या निगडीत असल्यामुळे, या पक्ष्याची विचारधारा जनसामान्यांपर्यंत आणि तळागाळा पर्यंत पोहोचावी यासाठी समाजातील जे वेगवेगळे आयाम आहेत त्या आयामापर्यंत पोहोचण्यासाठी भारतीय जनता पक्षाने प्रकोष्ठाची स्थापना केली.